चित्र- Bhakti Dalvi
माझ्या
#अप्रिय_पित्यास ,
"साष्टांग नमस्कार! माफ करा तुम्ही या पात्रतेचे नाही आहात तरी म्हणते! असो. पत्र लिहिण्यास कारण कि , तुमच्यावर थोडासा राग व्यक्त करायचा होता.
बुचकळ्यात नका पडू, मी सांगते, का मला राग आलाय तुमच्यावर. कारण तुम्ही मला जन्मालाच घातल नाहीत. माझ्या आईच्या उदारताच माझा गळा घोटलात. मला हे जग दाखवण्याचं जरासुद्धा कष्ट घेतलात नाही.
का? का तुम्ही मला मारलात? मी काय वाईट केलेलं? तुम्ही एका मुलीचे पिता होणार याची लाज वाटत होती का तुम्हाला ? किती छोटे विचार आहेत तुमचे. कीव येते मला तुमच्या विचारांवर.
एक सांगते, तुम्ही फक्त मला नाही मारल, एका स्त्रीला मारालात, एका आईला, एका बहिणीला , एका गोड गोष्ट सांगणाऱ्या आजीला मारालात तुम्ही! आणि माझ्यामुळे सगळं कृत्य तुमचं असूनही आईला जो त्रास दिलाय त्याबद्दल तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. या सगळ्याच पाप घेऊन कुठे जाणार तुम्ही?
खरा नपुंसक तो नसतो जो एखाद्या स्त्रीसोबत संबंध ठेवत नाही. खरा नपुंसक तर तो असतो जो एका स्त्रीलिंगी अपत्याला जन्मालाच घालत नाही. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यावर जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास मला होत होता त्यावेळी, अन तुम्ही वडील असून तुम्हाला जरासुद्धा काळजी वाटत नव्हती. हि खरी लाजिरवाणी गोष्ट आहे.
तुम्हाला माझ्याबद्दल ज्यावेळी कळलं त्यावेळी लाज वाटली, पण जर तुम्ही मला जन्म दिला असता तर कदाचित मी असं काही केलं असत ज्याने तुमची छाती गर्वाने पुढे आली असती.
लोकांना वाटत असेल की मी दुर्दैवी आहे, पण नाही. मी एक सुदैवी स्त्री आहे कारण मी जग बघितलं नाही पण जर जगात तुमच्या सारखे पुरुष असतील तर वाचले मी न जन्म घेऊन।"

तुमचीच
#जन्माला_न_आलेली
मुलगी
#जन्माला_न_आलेली
मुलगी
लेखन - FromPratham'sView
#SaveGirlChild

No comments:
Post a Comment